आपण निर्धारला मदत करू शकता

आमची वित्तीय धोरणे:

निर्धार प्रतिष्ठान या संस्थेला कोणत्याही प्रकारे सरकारकडून मदत मिळत नाही.

उत्पन्न

आमचे उत्पन्न मुख्यत: आयसीपींच्या कुटुंबांकडून शुल्क-स्वरूपात घेतलेल्या रकमेवर आहे; येथील आर्थिक कारभार ठेवी, उत्पन्न देणारी कामे, देणग्या आणि यावर मिळणारे बँक व्याज याच गोष्टींवर ही बऱ्याच अंशी अवलंबून आहे.


मुख्य खर्च

आतापर्यंतचा बहुतांश भांडवली खर्च हा एक-वेळ देणगी म्हणून झाला आहे आणि आमची वार्षिक महसुली तूट भरुन काढण्यासाठी आमच्याकडे आवर्ती निधी नसतो.

कर वजावट देणगी

निर्धार प्रतिष्ठान हा ना नफा ना तोटा धोरणावर चालणारी उदार विश्वस्त संस्था आहे. निर्धारला देण्यात आलेली सर्व देणगी भारतीय आयकर कायद्याच्या कलम ८०जी अंतर्गत कर वजा करता येते.

प्रायोजकत्व आणि देणगी:

आम्हाला आयसीपींसाठी प्रायोजकत्व आवश्यक आहे ज्यांचे पालक अनुदानित मासिक शुल्क भरू शकत नाहीत. विद्यमान सुविधांच्या उन्नतीसाठी व विस्तारासाठी हाती घेतलेल्या प्रकल्पांसाठी प्रायोजकत्व देखील आवश्यक आहे. निर्धार प्रतिष्ठान मानक स्वरूपात स्वयंपाकघरातील उपभोग्य वस्तू / खाद्यपदार्थ, नवीन कपडे, सहलीसाठीची वाहतूक व्यवस्था इत्यादी वस्तूंसाठी देणग्या देण्याऱ्यांचे नेहमीच स्वागत करते.

व्यावसायिक सेवा दान करा

व्यावसायिक सेवा/देणगी:

निर्धार प्रतिष्ठान ने येथे यापूर्वी समाजसेवकांनी दान केलेल्या अनेक प्रकारच्या सेवा अतिशय कृतज्ञतेने मान्य केल्या आहेत.
सध्याची पुढील काही गोष्टींना अग्रक्रम आहेः :

कन्सलिंग सेवा

वैद्यकीय सेवा

इंजिनियरिंग सेवा

विशेष शिक्षण

क्लब निर्मिती

शिक्षण सेवा

विशेष अभ्यासक्रम आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाची रचना, कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण, पालकांसाठी मानसिक समुपदेशन.

वैद्यकीय सेवा

वैद्यकीय आणि उपचारात्मक सेवा (पीटी, ओटी, पोषण, योग इ.) आणि इस्पितळा सेवा.

इंजिनियरिंग सेवा

इमारत, सुविधा, लँडस्केपींग आणि फलोत्पादन डिझाइन / प्रकल्प व्यवस्थापन / अंमलबजावणीसाठी अभियांत्रिकी सेवा.

क्लब निर्मिती

आपल्या शहरात जागरूकता आणि निधी संकलनासाठी निर्धार मित्रमंडळाची स्थापना करणे