स्वावलंबी होण्यासाठी बागायती
                            शाकाहारी वस्तूंच्या सतत घरगुती पुरवठ्यासाठी शेतीची नवीन पद्धत ‘रासायनिक खताचा वापर न करता‘ खड्ड्यातील शेती ’तंत्राचा वापर सुरू केली आहे.
                        
                        
                            
                            
                            सौर उर्जा व बॅक अप डीजी
                            निर्धार प्रतिष्ठान ने विद्युत उर्जा भार कमी करण्यासाठी (दिवसाचे सरासरी विद्युत वापर) सौर उर्जा व डीजी उर्जा प्रणालीचे संयोजन प्रस्थापित करण्याचे नियोजन केले गेले आहे.
                        
                        
                            
                            
                            जलसाठा संचयन
                            80 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडूनही उन्हाळ्याच्या महिन्यांत आम्हाला तीव्र पाणीटंचाई भासते. या प्रकल्पातून निर्धारला स्वावलंबी करण्याचा हेतू आहे आणि साधारण एका वर्षात तीन पिकांची खात्री देता येईल.
                        
                        
                            
                            
                            इमारत व सुविधा अत्याधुनिक करणे
                            निर्धार प्रतिष्ठान ची मूळ इमारत १६ वर्षांहून अधिक जुनी आहे. भोजनाचे दालन, स्वयंपाकघर, स्वच्छता गृह , पाणीपुरवठा व स्वच्छता सेवा यांची श्रेणी सुधारित करणे आवश्यक आहे. येथील आयसीपी सदस्यांना आवश्यक असणारी वृद्धावस्था / शारीरिक अपंगत्व असणाऱ्या सदस्यांना अनुकूल असणारी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे