निवासी सुविधा
पुरुष व महिलांसाठी अनुक्रमे दोन स्वतंत्र सदन (सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी) आहेत . सिद्धिविनायक सदनात चार शयनगृहांची एकूण २४ पुरुष रहिवाशांची क्षमता आहे, महिलांसाठी असलेल्या सदनात दोन शयनगृहांची एकूण क्षमता १४ महिला एवढी आहे. भविष्याकालीन वास्तू विस्तारासाठी पुरेसा वाव आहे.
तेथे एक एकत्रित स्वयंपाकघर आणि जेवणाचे सभागृह आहे ज्यात ३० सदस्य एका वेळेस भोजनाचा लाभ घेतील अशी सुविधा आहे. जेवणाच्या दालनाला लागून एक छोटेसे दालन आहे, येथे सदस्य सकाळी योगाभ्यास आणि योगसराव करतात. उर्वरित वेळ दूरदर्शन वरील कार्यक्रम पाहण्यासाठी किंवा कधी कधी नुसताच आराम करण्यासाठी या हे दालन वापरले जाते.
भेट देणार्या पालकांसाठी राहण्याची सोय वेगळ्या सदनात करण्यात आली आहे.